Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Konkan › पत्नीच्या छळप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍याला सक्‍तमजुरी

पत्नीच्या छळप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍याला सक्‍तमजुरी

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:18PMचिपळूण : खास प्रतिनिधी

सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासू, सासरे व पतीला येथील न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यातील सासरे मुरलीधर वाघाटे हे राजापूर येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. खेर्डी दत्तवाडी येथील स्वरा यांचा विवाह लांजा येथील सुजित वाघाटे याच्याशी झाला. त्या लोटे येथील एका कंपनीत कार्यरत आहेत. पती सुजित हा परदेशात बोटीवर कामाला असतो. लग्‍नानंतर काही दिवसांनी सासू मीनल वाघाटे हिने  सुनेला फ्लॅट घेण्यास तसेच नवर्‍याला दुचाकी व मोबाईल घेऊन देण्यास सांगितले. या शिवाय नवर्‍याला आणि दीराला आम्ही शिक्षणासाठी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे तुझा पगारही माझ्याकडे जमा कर, असे स्वरा वाघाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.  

याप्रकरणी घरातील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. येथील प्रवर्ग न्याय दंडाधिकारी एम. एन. चव्हाण यांनी सुनावणी घेतली आणि पती सुजित वाघाटे, सासू मीनल व सासरे मुरलीधर नारायण वाघाटे यांना सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील नसरीन मणेर यांनी फिर्यादीतर्फे बाजू मांडली. पोलिस तपास उपनिरीक्षक अशोक दाभोळकर यांनी केला.