Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Konkan › साखरप्यानजीक कार मोरीवरून कोसळून महिला ठार; २ जखमी

साखरप्यानजीक कार मोरीवरून कोसळून महिला ठार; २ जखमी

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 10:09PMभडकंबा : वार्ताहर 

देवरूख शिवाजी चौक येथील अगरबत्तीचे होलसेल व्यापारी महेश मांगले (वय 45) यांच्या नॅनो गाडीला रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास साखरपा-मुर्शी जाधववाडीनजीक अपघात होऊन यामध्ये कारमधून प्रवास करणार्‍या सायले प्राथमिक केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका पद्मा नलावडे (40) यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा नॅनो कारवरील ताबा सुटल्याने ती मोरीवरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला.

या अपघातात महेश मांगले जखमी झाले आहेत. त्यांना  अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले आहे. या अपघातात कारचालक संतोष खामकर  (रा. देवरूख) यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेले आहे. महेश मांगले हे रविवारी पहाटेच्या सुमारास नॅनो गाडी (एम.एच. 03 बीई 3713) मधून कोल्हापूरहून अगरबत्तीचे सामान घेऊन देवरूखच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.