Sun, Dec 15, 2019 03:34होमपेज › Konkan › टेम्पो झाडावर आदळून अपघात; चालक ठार

टेम्पो झाडावर आदळून अपघात; चालक ठार

Published On: Jun 11 2019 1:21AM | Last Updated: Jun 10 2019 10:47PM
देवरूख : विशेष प्रतिनिधी

आईस्क्रीम घेऊन जाणार्‍या टेम्पोची झाडाला धडक बसून सोमवारी अपघात घडला. मुंबई - गोवा महामार्गावर गोळवली येथे झालेल्या या अपघातात टेम्पोचालक जागीच ठार  तर त्याचा सहकारी क्लिनर जखमी झाला.

मॅक्स टेम्पो घेऊन चालक मेघ सिंह व त्याचा सहकारी विक्रम सिंह (दोघे राहणार उत्तर प्रदेश) आईस्क्रीम घेऊन मुंबई ते रत्नागिरी असे येत होते. या मार्गावरील गोळवली या ठिकाणी सकाळी 7 वाजता  ते असता, मेघ सिंग या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टेम्पो डाव्या साईडला असलेल्या झाडावर जाऊन आदळला. या अपघातात टेम्पोची पुढील बाजू पूर्णपणे चेपून गेली. यात चालक व त्याचा सहकारी अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी त्या दोघांना बाहेर काढले.

दोघांना नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे व 108 या रुग्णवाहिकेतून संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मेघ सिंह याला उपचारासाठी नेत असतानाच तो मृत झाला. विक्रम सिंह हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. शवविच्छेदन करून सायंकाळी मेघ सिंह यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संगमेश्‍वर पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.