Mon, May 27, 2019 09:47होमपेज › Konkan › एस.टी. धडकेत सुमोचालक ठार

एस.टी. धडकेत सुमोचालक ठार

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 11:06PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कणेरी येथे एस.टी. बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात सुमोचालक ठार झाला असून, वीस प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. संतोष गंगाराम गोलिपकर (45, नाणार, बौद्धवाडी) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास अपघात झाला.

राजापरू आगाराची अणसुरे- राजापूर ही बस गुरुवारी दुपारी 12 वाजता अणसुरे येथून राजापूरला येण्यासाठी निघाली. या बसवर चालक गोविंद देवकाते तर वाहक प्रल्हाद तेलंग होते. तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी सुमो प्रवासी भरून राजापुरातून सागवे येथे जात होती. दुपारी या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये सुमोतील चालक संतोष गोलिपकर यांच्यासह सईदा मजीद बोरकर (वय 50, रा. सागवे, राजापूर), झोया बोरकर (5, रा. सागवे, राजापूर) व सुनंदा मेस्त्री (65, रा. कणेरी, राजापूर) गंभीर जखमी झाले. तर भाग्यश्री शिरवडकर (28), सुजाता साळवी (45), सपना कदम (33), मनीषा खडपे (45) (सर्व राह. कणेरी) संपदा अवसरे (50, पडवे), प्रभाकर कदम (65, डोंगर), अशोक देवळेकर, सुंदर घाडी (60, नाणार), आरफीया मिरकर, जावेद पटेल, मुस्कान बाबाजी, नुरजहा पटेल, आशिया कुर्ले, भिकाजी तांबे, रामचंद्र खानविलकर, शिवराज कुळये, रामचंद्र राघव, आरफीया शेतले आदी किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर नाना कुवळेकर, मनोज देवकर, नगरसेवक बंड्या बाकाळकर, निलेश फाटक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमोत अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमींना तात्काळ अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, रत्नागिरी येथे उपचारादरम्यान चालक संतोष गोलिपकर यांचा मृत्यू झाला.