Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Konkan › एक दिवस भाजपचे नेते होऊन बघा : ना. पाटील

एक दिवस भाजपचे नेते होऊन बघा : ना. पाटील

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:24PMकणकवली : प्रतिनिधी

अलीकडे झालेल्या महामंडळांंच्या नियुक्त्यांमध्ये सिंधुदुर्गच्या पदाधिकार्‍यांचा समावेश का नाही, असा प्रश्‍न पत्रकारांनी भाजप नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी ‘एक दिवस तुम्ही भाजपचे नेते होऊन दाखवा, मग सर्वांना सांभाळून कसे काम करावे लागते ते तुम्हाला समजेल’ असे पत्रकारांनाच सांगितले.

शिवसेना, आरपीआय तसेच महादेव जानकरांची राष्ट्रीय समाज पार्टी अशा सर्वांना सोबत घेऊन आम्ही सरकार चालवित आहोत. त्यामुळे आम्ही समतोल साधत आहोत. अजुनही 40 महामंडळांची घोषणा व्हायची आहे, असे सांगत ना.पाटील यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी भाजप पदाधिकार्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कणकवली येथे विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अलिकडेच चंद्रकांत पाटील यांनी आपण निवडणुका लढविणार नसल्याचे संकेत दिले होते. आता त्यांनी यु टर्न घेत राजकारण सोडत नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर ना. पाटील यांच्यावरील उद‍्गारांना महत्त्व प्राप्त झाले आहे.