Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Konkan › सावंतवाडीतील साहित्यिकही मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर!

सावंतवाडीतील साहित्यिकही मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर!

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 8:12PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

तीन  समाजवादी विचारवंतांचे खून करण्यात आले याचे पडसाद  सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण  सभेत उमटले. या मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर सावंतवाडीतील काही साहित्यिक, लेखकांची नावे होती. अशा प्रवृत्तीचा निषेध  करणारा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. हा ठराव काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी मांडला. या ठरावाला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून तो एकमताने संमत करण्यात आला.

मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर असलेले हे साहित्यिक आणि त्यांच्या संस्थेचे नाव काय हे सांगण्यास परुळेकर यांनी नकार दिला. मात्र, आतापर्यंत नरेंद्र दाभोलकर यांच्या सह चार जणांचे गोळ्या घालून  खून करण्यात आले. या यादीमध्ये 27 जण हिटलिस्टवर असल्याचे एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्याचे डॉ. परुळेकर यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नगरसेवकांना देण्यात येणारा तुटपुंजा भत्ता वाढवून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे गटनेते राजू बेग यांनी केली.सध्या शंभर रुपये मिटिंग भत्ता दिला जात असल्याने या भत्त्याची रक्कम  राज्य शासनाला परत करण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितल.विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही हा शंभर रुपयांचा भत्ता परत करण्याचा निर्णय यावेळी  एकमताने घेतला.राजू बेग  म्हणाले, एकीकडे आमदार आणि खासदार आपापले भत्ते वाढून घेतात. आपल्या मानधनात वाढ करण्याची मागणी करतात आणि त्या मागणीचे पूर्तता करून घेतात. मात्र, नगरसेवकांना मिटिंगचा भत्ता केवळ शंभर रुपये मिळतो याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

आयत्या वेळच्या विषयांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सौ. दीपाली भालेकर यांनी शहरातील प्रत्येक शाळांच्या समोर रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारावेत, अशी मागणी केली. तसेच गणेशोत्सवाच्या तयारीची ही रंगीत तालीम घेण्याची मागणी त्यांनी केली.