Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Konkan › पालकमंत्री दीपक केसरकर यांची रिक्षाचालकांना ग्वाही 

...तर भावाप्रमाणे पाठिशी राहीन!

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:51PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

मुंबईत परप्रांतीयानी टॅक्सी,रिक्षा धंदा काबीज केला आहे. मुंबईतील भूमिपुत्र जो कोकणातील आहे तो कामाअभावी बेरोजगार झाला आहे. ‘ओला’ टॅक्सीने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मी तुमचा भाऊ आहे आणि माझ्याकडे गृहखाते असल्याने तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास हा भाऊ पाठीशी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ओला’ मार्गदर्शन कार्यक्रमात दिली . यामुळे ‘ओला’ विरोधासाठी आलेल्या  रिक्षाचालकांचा सूर मावळला.

सावंतवाडी- जिमखाना येथे ओला टॅक्सी सेवा मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ना. केसरकर बोलत होते. ओला कंपनीशी संलग्‍न मरियम टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स मुंबईच्या संचालिका सना कादरी, प्रशांत पालकर, उषा नाईक-वाडकर, प्रणिता पडते, नहारुक कादरी आदी उपस्थित होते. 

ना. केसरकर म्हणाले, उत्‍तरप्रदेश, युपी, बिहार येथून येणार्‍या तरुणांनी मुंबईतील स्थानिकांच्या रोजगारावर आक्रमण केले आहे. पुणे-मुंबईशी कोकणचे नाते  जवळचे आहे. या शहरांच्या जडणघडण आणि उभारणीमध्ये कोकणचा मोठा वाटा आहे. या शहरामध्ये रोजगाराचा वाटा जिल्हावासीयांपैकी कोणाला मिळाल्यास गृहराज्यमंत्री म्हणून आपण तुम्हाला निश्‍चितपणे मदत करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
यावेळी तब्बल 5 हजार तरुणांनी  ‘ओला’ सेवेबाबत माहिती घेतली.तर 14 जणांनी ओला कार घेण्याची तयारी दर्शविली. 35 चालकांनी मुंबईत ‘ओला’ कार चालविण्यासाठी संपर्क साधल्याची माहिती सना कादरी यांनी दिली. बर्‍याच जणांनी सिंधुदुर्ग जिल्ह ्यात ओला सुरू करण्याची मागणी केली. या प्रशिक्षणार्थींना मुंबईमध्ये रोजगार मिळवून देणार असल्याचे सना कादरी यांनी  स्पष्ट केले. 

या कार्यक्रमापूर्वी ओला टॅक्सीला विरोध  दर्शविणारे निवेदन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुधीर पराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना दिले.  यावेळी संघटनेचे भाऊ पाटील, धर्मेंद्र सावंत, भाई धरणे, निपो फर्नांडिस, सतीश केळुस्कर, सुनील तानावडे, नंदू डकरे, गजानन गावडे आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.