Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Konkan › व्हॉट्सअ‍ॅपवरून सामाजिक भावना दुखावणारी पोस्ट

व्हॉट्सअ‍ॅपवरून सामाजिक भावना दुखावणारी पोस्ट

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 10:50PMमंडणगड : प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅप या सोशल नेटवर्किंग साईटवरुन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर केल्याने श्रीकांत केसू लमाणी (रा. मुळसावळी, विजापूर, सध्या राहणार भिंगळोली) याच्याविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. 

या संदर्भात अजीम हमीद कडवेकर (रा. धुत्रोली) यांनी दि. 4 एप्रिल रोजी दाखल केलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार मंडणगड येथे ‘माय फेवरेट ग्रुप’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपमध्ये सर्वधर्मीय मिळून 154 सदस्य आहेत.  दिनांक 4 एप्रिल 2018 रोजी दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनी एका नंबरवरुन समाजाच्या धार्मिक भावना दुखावून अपमानित करणारी पोस्ट कडवेकर यांच्या नंबरवर आली. ही पोस्ट कोणी प्रसारित केली आहे. 

याचा शोध घेतला असता हा नंबर श्रीकांत केसू लमाणी यांचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कडवेकर यांनी या संदर्भात मंडणगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार  अशा प्रकारचा आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याप्रकरणी लमाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीकांत केसू लमाणी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. के. जाधव करीत आहेत.


Tags : Offensive,  Social, Emotional Touch Post, Whatsapp, Police, FIR, Ratnagiri