Mon, Feb 18, 2019 19:44होमपेज › Konkan › ओखी वादळ : कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटांमुळे मोठे नुकसान (Video)

ओखी वादळ : कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटांमुळे मोठे नुकसान (Video)

Published On: Dec 05 2017 4:02PM | Last Updated: Dec 05 2017 4:02PM

बुकमार्क करा

सिंधुदूर्ग : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा बसला. किनारपट्टीवरील मच्छिमारांचे साहित्य समुद्रात वाहून गेले. जाळी, दोरी, शिसे, किनाऱ्यावर वाळत घातलेली खटवी इत्यादी वाहून गेल्याने मच्छिमाराचे मोठे नुकसान झाले. समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

देवबाग येथील सांताक्रुझवाडी आणि मोर्वेकरवाडीत पाणी घुसले होते. मालवण बंदर जेटी येथे समुद्रात बुडालेली पोलिसांची सिंधू ५ ही गस्ती नौका आज किनाऱ्यावर परत आणली. यासाठी पोलिसांना मच्छिमार, स्कुबा डायव्हर्स व होडि व्यावसायिकांनी मदत केली. समुद्रातील ओहटीमुळे सकाळपासून उधाणाचा जोर ओसरला असला तरी वाऱ्याचा वेग मात्र कायम आहे. किनारपट्टीच्या भागात अधून मधून पावसाच्या सरी सुरू आहेत.

वेंगुर्ले बंदरावर नांगरून ठेवलेल्या ७ फायबर होड्यांना समुद्रात जलसमाधी मिळाली. समद्रातील पाण्याची पाण्याची पातळी वाढल्याने होड्या वाहून गेल्याने मच्छिमारांचे नुकसान झाले. किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती कायम कायम असून तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पंचनामा केला आहे.