Mon, Mar 25, 2019 09:47होमपेज › Konkan › मंजुरी दिलेल्या निकामी झालेल्या प्‍लास्टिक लिलावच नाही!

मंजुरी दिलेल्या निकामी झालेल्या प्‍लास्टिक लिलावच नाही!

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:02PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकामच्या लांजा उपविभागाने उत्तर विभागीय कार्यालयाची ज्या साहित्याच्या लिलावाची परवानगी घेतली नव्हती त्याचे लिलाव केले. परंतु, ज्या निरूपयोगी आणि निकामी झालेल्या प्‍लास्टिक आणि डांबराच्या पिंपांचा लिलाव करण्याची परवानगी उत्तर विभागाने दिली होती त्यातील केवळ पत्र्याच्या पिंपांचा लिलाव करण्यात आला.

सार्वजनिक बांधकामच्या कोणत्याही उपविभागातील साहित्याचा लिलाव करायचा असेल तर वरिष्ठ असलेल्या उत्तर विभागीय कार्यालयाची मंजूरी घ्यावी लागते. परंतु, लांजा उपविभागीय अभियंता आर.एन.सावंत यांनी भांबेड पवारवाडी येथील जुन्या पुलाचे आठ टन स्टील (लोखंडी सळई) शासकीय रस्त्याच्या कडेच्या झाडांचा लिलाव करताना उत्तर विभागाची परवानगी घेतली नाही. परस्पर आपल्या अधिकारात लिलाव करून त्याबाबतची माहिती उत्तर विभागाला कळवून झालेल्या लिलाव कार्यवाहीला परवानगी मागितली.

उत्तर विभागाची पूर्व परवानगीच न घेतली गेली असल्याने उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता कमलाकर पाताडे यांनी लांजा उपविभागाने केलेल्या स्टील आणि झाडांचा लिलाव नामंजूर केला. झाडांचा लिलाव करताना वनविभागाकडून झाडांचे मूल्यांकन आणि लिलावासाठी परवानगी घ्यावी लागते तीही घेण्यात आली नव्हती. एकीकडे ज्याची परवानगी नव्हती त्याचे लिलाव करण्यात आले. त्याचवेळी दुसरीकडे ज्या पिंपांच्या लिलावासाठी परवानगी देण्यात आली होती त्यातील फक्‍त पत्र्यांच्या पिंपांचा लिलाव करण्यात आला.

निरूपयोगी व निकामी झालेल्या पत्र्याच्या 663 आणि प्‍लास्टिकच्या 313 पिंपांचा लिलाव करण्यासाठी उत्तर विभागाने मंजुरी दिली होती. परंतु त्यातील पत्र्यांची पिंप लिलावात काढण्यात आली. ज्या दिवशी पुलाच्या स्टिलचा लिलाव करण्यात आला, त्याच दिवशी पत्र्याच्या पिंपांचाही लिलाव देण्यात आला. दरम्यान, प्‍लास्टिकची सर्व पिंपे उपविभागाच्या आवारात तशीच पडून आहेत.