Fri, May 24, 2019 02:58होमपेज › Konkan › 2019 मध्ये मला कुणीही हरवू शकत नाही : आ.नितेश राणे

2019 मध्ये मला कुणीही हरवू शकत नाही : आ.नितेश राणे

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 9:07PMकणकवली : वार्ताहर

कणकवली नगरपंचायतीत मालक म्हणून काम करणार्‍या स्वाभिमान विरोधी पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. मालक हरले आणि सेवक असलेला स्वाभिमान पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आम्ही सर्वच कार्यकर्ते सेवक आहोत आणि हे रयतेचे राज्य आहे. जनतेपेक्षा कोणीही मोठे समजू नये. मालक समजणार्‍यांना हे जनतेने दिलेले उत्तर आहे असा टोला आ.नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला हाणला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेमय करणे हेच आमचे लक्ष आहे. देऊ तो शब्द पूर्ण करणार, कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी केलेल्या संघटित कामातून आणि जनतेने देवगड-वैभववाडीत विकासकामे केली त्यावर विश्‍वास ठेऊन कणकवलीत हे विजयाचे सर्टिफिकेट दिलेले आहे. 2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मला कुणीही हरवू शकत नाही. राणे यांना गमावल्यामुळे काँग्रेसची ही अवस्था झाली आहे, असेही आ.नितेश राणे यांनी सांगितले. 

नारायण राणे हे आमचे दैवत आहे. ते आमचा स्वाभिमान आहेत. स्वाभिमानाला नख लावण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर कार्यकर्ता पेटून उठतो. संदेश पारकर यांना राणे यांनी लाल दिवा दिला. जो शब्द दिला तो पाळला. मात्र ,या निवडणुकीत राणेंबद्दल काढलेले अपशब्द हा कार्यकर्त्यांचा अपमान होता आणि त्या अपमानाचा बदला कार्यकर्त्यांनी घेऊन विजयानंतर मिरवणुकीने राणेंचा फोटो कणकवली नगरपंचायतीमध्ये लावला. खरे म्हणजे 2014 पासून जिल्हा बँक, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्‍न बाजार समिती, सहकारी संस्था, 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि नगरपंचायती राणेंच्या विचारांच्या निवडून देऊन जनतेने 2019 च्या विजयाची खात्री दिलेली आहे.

देवगड, वैभववाडीनंतर कणकवलीत मला जनतेने मिळवून दिलेला विजय  हा माझ्या कामाची पोच आहे. येथील नागरिकांना मी जो शब्द दिला आहे. वेगळ्या स्वप्नवत शहराची निर्मिती करूनच दाखवू असा विश्‍वासही आ.नितेश राणे यांनी व्यक्‍त केला. 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी माझा पराभव करू शकत नाही.  माझ्यावर टीका, राणे कुटुंंबावर टीका करुन मते मिळत नाहीत. हे जनतेनेच दाखवून दिलेले आहे. राणे आणि सिंधुदुर्ग, कणकवली असे एक वेगळे नाते आहे हे या विजयातून सिद्ध झाले. काँग्रेस पक्षाचे 200 च्या जवळपास मते मिळून डिपॉझिट जप्त झाले यातूनच त्यांनी राणेंना गमावल्यानंतर काय मिळवले याचे परीक्षण करावे, असे आ.नितेश राणे यांनी सांगितले.

Tags : Konkan, Nobody, can, beat, me,  2019, election, MLA, Nitesh Rane