Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’ नको ‘वायनरी’ द्या

‘रिफायनरी’ नको ‘वायनरी’ द्या

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:19PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रात सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल करणार्‍या  वाईनरी प्रकल्पांना एक्साईज ड्युटी माफ केली असताना कोकणात हा कर लागू ठेवल्याने कोकणातील सुमारे 25 वाईनरी प्रकल्पांचे प्रस्ताव रखडले आहेत. अलीकडेच हिवाळी अधिवेशनात याबाबत कोकणातील लोकप्रतिनिधींनी ‘रिफायनरी नको वाईनरी द्या’ या मागणीसह संघटित झाल्यानंतर आता या प्रकल्पाबाबत सकारत्मकता दर्शविण्याची तयारी झाली असल्याचे समजते. मात्र, एक्साईज ड्युटी रद्द केल्यानंतरच या प्रकल्पातील अडसर दूर होणार असल्याचे याबाबत सूत्रांकडून सांगण्यात येते. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील विविध जातींच्या आंब्यांवर प्रक्रिया करून वाईन काढण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. कोकणातील हापूस, रायवळ, केसर आदींसह करवंदे, कोकम, जांभूळ  यापासून 

दर्जेदार वाईन तयार होऊ शकते. याबाबत विद्यापीठाने संशोधनाद्वारे कोकणातील उद्योजकांना प्रेरित केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात द्राक्षापासून तयार करण्यात येणार्‍या वाईनसाठी एक्साईज ड्युटी माफ केली आहे. येथील  90 टक्के उत्पादन निर्यातक्षम असल्याने या भागात वायनरी प्रकल्पातून सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल होतेे.

प्रकल्पाची मान्यता रखडली

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात आंबा हंगामात शेवटच्या टप्प्यातील आंबा कॅनिंग  पल्प अथवा अन्य उपप्रक्रिया उत्पादनासाठी  रद्दीच्या दरात विकला जातो. या फळांच्या मद्यार्कापासून चांगल्या दर्जाची वाईन तयार हऊ शकते. यासाठी कोकणातील 25 प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, एक्साईज ड्युटीच्या निर्णयावर या प्रकल्पांची मान्यता रखडली आहे.  अलीकडेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात रिफायनरीचा विरोध करताना कोकणातील लोकप्रतिनिधींनी वायनरीला मान्यता देण्याची मागणी केली. मात्र, त्यासाठी उत्पादन शुल्क माफ करण्याची मागणी करताना या प्रकल्पांचा मार्ग खुला करण्याची मागणी केली आहे.