Tue, May 21, 2019 04:52होमपेज › Konkan › यापुढे आरोग्यविषयक असुविधा राहणार नाहीत!

यापुढे आरोग्यविषयक असुविधा राहणार नाहीत!

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:32PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सावंतवाडीच्या जनतेला यापुढे आरोग्यविषयक कसलीही असुविधा राहणार नाही याची दक्षता आपण स्वत: घेणार असल्याचे आश्‍वासन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय  चाकूरकर यांनी दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर शनिवारी सावंतवाडीत आले असता त्यांनी नगराध्यक्ष कक्षात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत आरोग्याच्या प्रश्‍नांसदर्भात चर्चा केली.त्यानंतर त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात  स्त्री व पुरुष वार्ड तसेच ट्रामा केअर सेंटर,आयसीयू,व्हॅन्टिलेटरची पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छतेबरोबर औषधांच्या पुरवठ्याबद्दल चौकशी करुन तत्काळ औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.रुग्णालयाचे डॉ. पाटील,नगराध्यक्ष बबन साळगावकर,भाजपा जिल्हा चिटणीस राजन तेली, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर,भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, आरोग्य सभापती आनंद नेवगी,पाणीपुरवठा सभापती  सुरेंद्र बांदेकर ,डॉ. ज्ञानेश्‍वर  दुर्भाटकर, डॉ. चितारी, संजू शिरोडकर उपस्थित होते.

बंद न पडणारी व्हॅन्टिलेशन, सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी यावेळी संजू शिरोडकर यांनी केली. औषधांच्या तुटवड्याबद्दल विचारणा केली असता आरकेएस द्वारे औषधे द्यावीत अशा सूचना डॉ. चाकूरकर यांनी केल्या. तर रुग्णालयातून बदली झालेल्यांना आरोग्य संचालनावरुनच कार्यमुक्त केले जाते असे त्यांनी सांगितले.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रुग्णालयाच्या गैरसोईकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्याने आपण आलो असून यापुढे अचानक भेट देऊन पाहणी  करणार असून यापुढे कोणतीही असुविधा रुग्णालयात जाणवणार नाही याची काळजी घेणार असल्याचे डॉ.चाकूरकर म्हणाले. 

सर्वपक्षीय आंदोलनानंतर हे यश मिळाले व पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे श्री. साळगावकर यांनी आभार व्यक्त केले तर सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील सशक्त रुग्ण सेवेसाठी विविध फंडातून निधी देऊ,असे भाजपा प्रदेश चिटणिस राजन तेली यांनी सांगितले.