Mon, Jun 17, 2019 03:11होमपेज › Konkan › नांदगावात आता विरोधक शिल्लक नाहीत : आ. राणे

नांदगावात आता विरोधक शिल्लक नाहीत : आ. राणे

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:04PM नांदगाव : वार्ताहर

नांदगावात विरोधक आता फक्‍त औषधाला शिल्लक राहिले आहेत.राणेंच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन तुम्ही आमच्या स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. आता शेवटच्या घरापर्यत विकास पोहचवत एकमनाने एकदिलाने काम करा,असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी येथे केले. नांदगाव येथे शिवसेना व भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत यांचे खंदे समर्थक शिवसेना कासार्डे उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील, युवासेना नांदगाव शहर अध्यक्ष सागर पाटील, आकाश पाटील, शिवसेना नांदगाव ग्रा.पं. सदस्य रेणुका पाटील, नांदगाव सरपंच पदाच्या उमेदवार अ‍ॅड. मेघा परब, ओंकार परब, पूजा परब 
यांचा पक्षप्रवेशामध्ये समावेश आहे.         

नितेश राणे म्हणाले, या जिल्ह्याचा खर्‍या  अर्थाने विकास नारायण राणेच करू शकतात हे प्रत्येकाला माहीत झाले  आहे. विकास हवा  असेल तर राणे यांच्याशिवाय पर्याय नाही.नांदगाव हा राणेंवर प्रेम करणारा गाव आहे. तुम्ही एकदिलाने काम करा तुम्हाला सहकार्य, सुरक्षा देण्याची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, डॉ.मिलिंद कुलकर्णी, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, पं. स.सदस्या हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच रितिका सावंत, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, सोसायटी चेअरमन रवींद्र तेली, भाई मोरजकर, सदा बिडये, रयासीन नावलेकर, भालचंद्र साटम, आदम साटविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत वाळके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.