दोडामार्ग : प्रतिनिधी
महामार्गाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल ओतल्याने दोडामार्ग पोलिस कोठडीत असलेल्या आ. नीतेश राणे यांची खा. नारायण राणे यांनी शनिवारी भेट घेत विचारपूस केली.माजी खा. निलेश राणे,सौ.नीलम राणे उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.
महामार्गाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आ.नीतेश राणे यांनी चिखल ओतला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलिस कोठडी मिळाली. मात्र आ. राणे यांना कणकवली येथे न ठेवता त्यांना दोडामार्ग पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. त्यामुळे शुक्रवारपासून दोडामार्गमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर प्रथमच खा. नारायण राणे जिल्ह्यात आल्यावर त्यांनी दोडामार्ग मध्ये येऊन आ. नितेश राणे यांची भेट घेत त् विचारपूस केली मात्र याबाबत पत्रकारांशी बोलणे त्यांनी टाळले.