Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Konkan › स्वाभिमानकडून खासदारकीसाठी नीलेश राणे उमेदवार!

स्वाभिमानकडून खासदारकीसाठी नीलेश राणे उमेदवार!

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:53PMमालवण : प्रतिनिधी

माझी खासदारकी ही सहा वर्षांसाठी आहे, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीबरोबरच मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात  माजी खासदार नीलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे सुतोवाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.नारायण राणे यांनी केले.  मी देईन तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. जिल्ह्यात स्वाभिमान पक्षाचे तीन आमदार आणि एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालून आपण स्वाभिमानचे  आमदार खासदार निवडून आणू. त्यामुळे इथली जबाबदारी तुम्ही घेतली तरच पुढच्या वेळी आपला पक्ष सत्तेत असेल. म्हणूनच गटबाजी आणि मतभेद विसरून आतापासून कामाला लागा, असे आदेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

कोळंब येथील समर्थ मंगल कार्यलयात मालवण तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी सायंकाळी झाला.  व्यासपीठावर स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि. प.  बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकध्यक्ष मंदार केणी, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सुहास हडकर, लीलाधर पराडकर, जि.प. सदस्य सरोज परब, जेरॉन फर्नांडिस, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, कोळंब सरपंच प्रतिभा भोजने, सोनाली कोदे, ममता वराडकर, बाळू कुबल, निलिमा सावंत, मामा माडये तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली चार वर्षांत जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. सत्ताधार्‍यांनी अनेक प्रश्‍न प्रलंबित ठेवूनही येथील जनता गप्प आहे. आता  जनतेने जागरूक बनून याचा जाब सत्ताधार्‍यांना विचारायला हवा.  जिल्ह्यात मटका, जुगार, दारू धंदे, वेश्या व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. याविषयी लोकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे जे सत्ताधारी जिल्ह्यात अवैध धंदे सुरू ठेवून येथील भूमी बिघडवत असतील आणि आपण त्याविरोधात आवाज उठविण्याबरोबरच चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करत नसू तर तुमचा, माझा उपयोगच काय?  असा सवाल श्री. राणे यांनी उपस्थित केला. 

जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आहे. पाण्याची समस्या, रेशनिंगवर धान्य नाही अशा विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. याचा जाब विचारण्याऐवजी लोकही झोपल्याचे दिसून येत आहे. समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी वजन लागते. नुसते वजन असून उपयोग नाही, अशी टीका श्री. राणे यांनी केली.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येत्या ऑगस्ट महिन्यापासून स्वाभिमान पक्षाच्या संघटना बांधणीच्या दृष्टीने संपर्क अभियान राबविण्यात यावे व 25 मतदारांमध्ये एक कार्यकर्ता अशी बूथवाईज विभागणी केली गेल्यास यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

‘त्या’ पराभवाचे मनात अजूनही शल्य

खा. नारायण राणें यांनी  2014 साली झालेल्या निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख केला. ते म्हणाले, तो माझा पराभव नव्हताच, तो एक अपघात होता. दादा निवडून येणार हा अतिआत्मविश्‍वास कार्यकर्त्यांना नडला. माझा पराभव करण्याची ताकद विरोधकांत नाही. आपण जागरूक न राहिल्याने आपला पराभव झाला हे शल्य मला टोचत आहे,