Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Konkan › रास्ता रोको प्रकरणी नीलेश राणेंसह शंभर जणांवर गुन्हे

रास्ता रोको प्रकरणी नीलेश राणेंसह शंभर जणांवर गुन्हे

Published On: Aug 04 2018 10:55PM | Last Updated: Aug 04 2018 10:35PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मराठा आंदोलनासाठी शुक्रवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हातखंबा येथे रोखल्याप्रकरणी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे माजी खा. नीलेश राणे यांच्यासह  सुमारे शंभर जणांवर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने  शुक्रवारी रत्नागिरी बंदनंतर हातखंबा येथे रास्ता रोको करण्यात आला होता.  आंदोलनादरम्यान सुमारे एक तास महामार्ग बंद ठेवल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रकरणी रात्री उशिरा रत्नागिरी पोलिस ठाण्यात माजी खा. नीलेश राणे, सचिन आचरेकर, संकेत चवंडे, अशोक वाडेकर, मेहताब साखरकर, नित्यानंद दळवी, अजिंक्य राऊत यांच्यासह आंदोलनात सहभागी 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश कदम अधिक तपास करीत आहेत.