Sun, May 19, 2019 22:36होमपेज › Konkan › नीलेश इच्छुक.तरीही उमेदवारीत पक्षपातीपणा करणार नाही!

नीलेश इच्छुक.तरीही उमेदवारीत पक्षपातीपणा करणार नाही!

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 10:20PMकुडाळ : प्रतिनिधी 

2014 मध्ये लोकसभा निवडणूकीत नीलेश राणेंचा तो पराभव नव्हताच ती तर मोदींची लाट होती.आता  नीलेश राणेनी इच्छा व्यक्‍त केली आहे. मात्र  उमेदवारी जाहीर करताना मी पक्षपातीपणा करणार नाही,असे प्रतिपादन खा. नारायण राणे यांनी करत 2019 च्या विधानसभा व लोकसभा उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवले.

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे स्वाभीमान पक्षाचा मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,जिल्हा बॅक अध्यक्ष सतिश सावंत, तालुकाध्यक्ष दिपक नारकर, अशोक सावंत, अस्मिता बांदेकर, संदीप कुडतरकर, प्रकाश मोर्ये, विशाल परब ,दादा साईल आदी उपस्थित होते.

खा. राणे म्हणाले, कुडाळ जिल्ह्याचे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे कुडाळच्या मेळाव्याला महत्त्व आहे. आपल्या जुन्या कार्यकर्त्यांनी नव्याना सोबत घेवुन काम करावे. मला पक्षात मतभेद नको आहेत. पक्ष स्थापनेनंतर मला दोन निवडणुकीत विजय दिला असल्यामुळे मी समाधानी आहे. मला 2019 ची निवडणूक महत्वाची आहे. मी कामाला लागलो आहे, तुम्ही सुध्दा कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना केले. मी खासदार असलो तरी निवडणूक लढविणार नाही अस कुणी समजू नये. राज्याच्या सत्तेत आम्ही सहभागी होवु एवढे संख्याबळ आपण मिळवू शकतो, त्यासाठी प्रयत्नशील रहा असे आवाहन करत त्यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर टीका केली.  कुडाळ तालुकाअध्यक्ष दीपक नारकर यांच्या कामाचे राणे यांनी खास कौतुक केले.

सतीश सावंत म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्यापेक्षा आपण कमी नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवुन काम करावे. गेल्या चार वर्षात त्यांनी काहीच काम केल नाही. वनसंज्ञा व आकारीपड  प्रश्‍न ही मंडळी सोडवू शकले नाही. हे जनतेपर्यंत पोहचवा. यापुढे  तिन्ही आमदार व एक खासदार स्वाभिमान पक्षाचा असेल, असा विश्‍वास सावंत यांनी व्यक्‍त केला.

संघटना बॅकफूटवर का?

माजी जि.प.अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर आपल्या संघटनेत नाहीत तर मग कुडाळ मध्ये संघटना बॅकफुटवर का?असा खडा सवाल  स्वाभीमान पक्षाचे प्रवक्‍ते  संदीप कुडतरकर यांनी करत आता तुम्हीच तुमच्या मनाचे राजा आहात त्यामुळे संघटना वाढलीच पाहिजे, असे सांगितले.