Wed, Sep 26, 2018 13:03होमपेज › Konkan › ओरी मठ येथे आंबा बागेत नेपाळी गुरख्याची आत्महत्या

ओरी मठ येथे आंबा बागेत नेपाळी गुरख्याची आत्महत्या

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:45PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अज्ञात कारणावरून ओरी मठ येथील आंबा बागेत झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत नेपाळी गुरख्याने आत्महत्या केली. आत्महत्येची ही घटना गुरुवारी सकाळी 9 वा. सुमारास उघडकीस आली.

खेमबहाद्दर सिंग (40, मूळ रा. गौरीगंगानगर, जिल्हा कैलाली,  नेपाळ. सध्या रा. ओरी मठ टेकडीवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या गुरख्याचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांना प्रदीप प्रताप साळवी (रा. मालगुंड, वरचावठार, मराठवाडी) यांनी खबर दिली. त्यानुसार, प्रदीप साळवी यांनी विश्‍वनाथ देसाई यांची ओरी मठ येथील आंब्याची बाग कराराने घेतलेली आहे. या बागेत खेमबहाद्दर सिंग गेली दोन वर्षे राखणदार म्हणून काम करत होता. तो या बागेत रामकिशन बल्‍लूभाऊ चौधरी याच्यासोबत राहात होता. 

गुरुवारी सकाळी विश्‍वनाथ देसाई यांनी प्रदीप साळवी यांना फोन करुन खेमबहाद्दर सिंग याने बागेतीलच झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची माहिती फोनवरुन दिली.त्यानुसार प्रदीप साळवी यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांनी खबर दिली. आत्महत्येची माहिती मिळताच ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.