Wed, Jan 23, 2019 17:03होमपेज › Konkan › उच्च प्रतीची साखर तयार करण्याची गरज : पवार

उच्च प्रतीची साखर तयार करण्याची गरज : पवार

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:36PMकळंब : परवेज मुल्ला

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उद्योगात असलेल्या राज्यांची स्थिती वेगळी असून उत्तर प्रदेशलगत साखर विक्रीस वाव असणारे अनेक राज्ये आहेत. परंतु महाराष्ट्राच्या आसपास असलेली राज्ये स्वत:च साखर उत्पादक आहेत. यामुळे राज्यातील साखर उद्योगाला साखर विक्रीसाठी आता नव्या वाटा शोधाव्या  लागणार आहेत. तरी उच्च प्रतीची साखर निर्माण करून ती इतर प्रदेशात पाठविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी केले. 

रांजणी (जि. उस्मानाबाद) येथील एका खाजगी साखर कारखान्याच्या 14 लाख 111 साखर पोत्याचे पूजन व ‘साखरनामा’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रूय ग्रहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आ. राहुल मोटे, विद्याधर कांदे-पाटील, काररखान्याचे संस्थापक बी.बी. ठोंबरे आदी उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाले की, राज्यात कुटुंबांची संख्या वाढलेली आहे. यामुळे एकूण जमीनधारण्यात झपाट्याने कमी झाली आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणार्‍या कुटुंबाने यापुढे केवळ शेतीवर निर्भर न राहता शेतीपूरक जोडधंदा व प्रक्रिया उद्योग याकडे वळणे गरजेचे आहे.