Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Konkan › ‘सर्वांग सुंदर सावंतवाडी’साठी सहकार्याची गरज- केसरकर

‘सर्वांग सुंदर सावंतवाडी’साठी सहकार्याची गरज- केसरकर

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 10:58PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी 

आधीच सुंदर असलेले सावंतवाडी शहर सवार्ंग स्वच्छ बनविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. शहरातील  सांडपाणी निचरा व स्वच्छतेसाठी  पुण्यात तयार करण्यात येणारी ड्रेनिंग यंत्रे आमदार निधीतून देण्याचे आश्वासन  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर,उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर,आरोग्य सभापती आनंद नेवगी,सुरेद्र बांदेकर,माजी सभापती बाबू कुडतरकर,शिवसेना शहरप्रमुखशब्बीर मणीयार,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,विद्यमान नगरसेवक मनोज नाईक.दीपाली सावंत,भारती मोरे, दिपाली सावंत,माजी नगरसेवक सुरेश भोगटे,विलास जाधव,कीर्ती बोंद्रे,अभय पंडीत,आत्माराम ओटवणेकर, सौ केसरकर,शैलेश नाईक सचिन मोरजकर,दीपक सावंत, पोलिस उपनिरीक्षक अरूण जाधव,बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक आदीसह अनेक पदाधिकारी संस्था,भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी,डॉक्टर व प्राध्यापक आणि  सर्वधर्मीय नागरीक या अभियानात सहभागी झाले होते 

केसरकर म्हणाले, सावंतवाडी आधीच सुंदर आहे, ती कायम स्वच्छ राहावी यासाठी नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे. नगराध्यक्ष  साळगावकर यांच्याकडे दिलेली जबाबदारी ते व्यवस्थित पार पडत आहेत. परंतू त्यांनी उचललेले स्वच्छतेचे शिवधनुष्य नागरिकांनी सवंगडी म्हऩुन पेलावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.  महास्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी रविवारी सकाळी 7.30 वा. सावंतवाडीत दाखल होत स्वतः हातात झाडू घेतला आणि स्वच्छतेचा मंत्र दिला. केसरकर यांनी संपूर्ण शहरात फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला.या संवाद अभियानपाची सुरुवात बाहेरचा वाड़ा येथे केली. त्यानंतर ते भटवाडीत गेले. नगराध्यक्ष व पदाधिकार्‍यासमवेत त्यांनी ज्युस्तिननगर,गरड, मोरडोंगरी,सर्वोदय नगर,सालईवाडा,मिलाग्रीस जवळून बाजारपेठेतून फेरफटका मारत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले.