Fri, Sep 21, 2018 22:01



होमपेज › Konkan › टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 10:09PM



सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी

भारतीय डाक विभागामार्फत यावर्षी ढाई आखर राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय ‘माझ्या मातृभूमीस पत्र’ असा असून मराठी, हिंदी  व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. 

ही स्पर्धा खुली असून 18 वषार्ंपर्यंत व 18 वर्षांवरील अशा दोन गटात होईल. पत्रलेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा किंवा साध्या लिफाफ्यामधून आवश्यक तिकीट लावून ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 1 हजार शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द अशी आहे. स्पर्धकांनी आपले पत्र दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - 400001 या पत्त्यावर पाठवावे. सर्कल स्तरावरील निवडक पहिल्या 3 पत्रांना गटाप्रमाणे प्रथम क्र. 25 हजार रुपये, द्वितीय क्र. 10 हजार रुपये, तृतीय क्र. 5 हजार रुपये पारितोषिक दिले जाईल. 

सर्कल स्तरावरील अशी तीन पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमांकाच्या पत्रांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये व 10 हजार रुपये अशी पारितोषिके दिली जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक संजय देसाई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in वर लॉगऑन करावे.