Thu, Apr 25, 2019 05:31होमपेज › Konkan › राणेंचे जोरदार कमबॅक; शिवसेनेचा पराभव करून आचरा पंचायतीवर मिळवली सत्ता 

आचरा पंचायतीवर राणेंच्या 'स्वाभिमान'ची सत्ता; शिवसेनेचा मोठा पराभव

Published On: Feb 28 2018 12:08PM | Last Updated: Feb 28 2018 4:04PMआचरा: उदय बापर्डेकर

बहुचर्चित आचरा ग्रामपंचायतीवर नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सत्ता मिळवली आहे. ग्रामपंचायतीतील 13 पैकी 8 जागांवर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेला केवळ 3 जागा मिळवता आल्या. दोन जागांवर अपक्ष विजयी झालेल्या सदस्यांनी स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिला आहे.  

सरपंच पदी स्वाभिमान पक्षाचे पुरस्कृत प्रणया टेमकर या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या ललिता पांगे याचा पराभव केला. प्रणया टेमकर यांना १७३१ मते मिळाली तर ललिता पांगे यांना ९०० मते मिळाली. या निवडणुकीत ६६ मते नोटा मिळाली.  

आचरा ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी 69.30 टक्के मतदान झाले होते. सरपंच पदासाठी 2 तर सदस्यपदाच्या 13 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. कांदळगावच्या पोट निवडणुकीतही स्वाभिमान पक्षाच्या श्रुतिका कुंभार या विजयी झाल्या.

आचरा ग्रामपंचायत निवडणूक निकाल-

*सरपंच पद- प्रणया मंगेश टेमकर ( विजयी १७३१), ललिता राजन पांगे (९००), नोटा- ६६.

प्रभाग १- (सर्वसाधारण महिला)- रेश्मा कांबळी (विजयी- १६६ मते), कीर्ती पेडणेकर (५३), शिवानी मुणगेकर (१४९), नोटा- ११. (खुला प्रवर्ग)- पांडुरंग वायंगणकर (विजयी- २००), किशोर कांबळी (९६), समीर बावकर (८१), नोटा-०३. 

प्रभाग २ (ना.मा.प्र.)- मुजफ्फर मुजावर (अपक्ष) (विजयी- २६५), प्रमोद कोळंबकर (१०१), संतिष  तळवडकर (९१), नोटा- १, (सर्वसाधारण स्त्री)- दिव्या आचरेकर (विजयी २११), संचिता आचरेकर (१४), गौरी सारंग (९७), कांचन करंजे (९४), नोटा- ४४. 

प्रभाग ३- (खुला प्रवर्ग)- राजेश पडवळ (विजयी- १६१), जुबेर काझी (११२), रवींद्र बागवे (१३३), सुनील सावंत (१२७), नोटा- ७, (नामाप्र)- योगेश गावकर (विजयी २९९), मंगेश मेस्त्री (२२९), नोटा- १५. (सर्वसाधारण स्त्री)- अनुष्का गावकर (विजयी- ३०६), नीता पांगे (२११), नोटा- २६.

प्रभाग ४ - लवू तुकाराम घाडी (विजयी २९२), सचिन परब (२१८), रुपेश साटम (६२), नोटा- १४. श्रद्धा नलावडे (विजयी ३१९), करिष्मा सक्रु (२५१), नोटा- १६, वैशाली कदम (विजयी ३००) रिया घाडी (२६९), नोटा-१७.

प्रभाग ५- मंगेश टेमकर (विजयी ४१४), सुनील खरात (२८१), चंद्रशेखर भोसले (२७), नोटा- ७, वृषाली आचरेकर (विजयी ५८६), युगंधरा मोर्जे  (११०), नोटा- ३३. ममता मिराशी (विजयी ५४३), कांचन करंजे (१६३), नोटा- २३.