Fri, Apr 26, 2019 10:02होमपेज › Konkan › उसाचा ट्रक उलटून मजूर ठार

उसाचा ट्रक उलटून मजूर ठार

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:24PM

बुकमार्क करा
नांदगाव : वार्ताहर

कणकवली तालुक्यातील पियाळी-मुरकरवाडी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ऊस तोडणी मजूर संतोष गणपती पाटील (35, रा. तळगाव-भुजीग,पाटीलवाडी, राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऊस तोडणीची कामे जोरात सुरू आहेत. पियाळी परिसरातील ऊस डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखाना, गगनबावडा येथे नेण्यासाठी अनेक ट्रक ये-जा करत आहेत. सोमवारी रात्री ट्रकचालक अब्दुल रहिमान बाळू पाटणकर (रा.मातुली-पकालवाडी, राधानगरी) हा  पियाळी- मूरकरवाडी येथील ऊस भरून गगनबावडा साखर कारखाना येथे ट्रक घेऊन जात होता.

पियाळी-मुरकरवाडी येथील अरुंद रस्त्यावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटलाने ट्रक क्लिनरच्या बाजूने लगतच्या घराचे कुंपण तोडत साईटपट्टीवर पलटी झाला. यात क्लिनर बाजूला बसलेले संतोष गणपती पाटील हा ट्रकखाली सापडून चिरडला गेल्यानेे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी चालकाला बाहेर काढत वाचवले. मात्र, मयत संतोष पाटील पलटी झालेल्या ट्रक खाली सापडल्याने त्याला वाचविणे ग्रामस्थांना शक्य झाले नाही.