Thu, Sep 20, 2018 10:09होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे धुुक्याची चादर

रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे धुुक्याची चादर

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 8:51PM

बुकमार्क करा

नांदगाव : वार्ताहर

 अवकाळी पावसाचे सावट दूर होत असताना आता खर्‍या अर्थाने हिवाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. गेली दोन दिवस थंडी जाणवत असून पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

सध्या सर्वत्र तापमानाचा पारा खाली आला असून आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे साथीचे थंडी, ताप व खोकला आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.