होमपेज › Konkan › कोकणातील आमदारांचे नागपूर विधानभवनासमोर धरणे

कोकणातील आमदारांचे नागपूर विधानभवनासमोर धरणे

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:41PM

बुकमार्क करा

नागपूर : अजित सावंत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व कणकवली व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायत क्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात  विस्थापितांना ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्रातील गुणांकाप्रमाणे मोबदला मिळालाच पाहिजे, यासाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. वैभव नाईक यांच्यासह कोकण व मुंबईतील आमदारांनी नागपूर विधानभवनासमोर धरणे आंदोलन छेडले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या चौपदरीकरणात विस्थापितांना त्यांच्या मालमत्तेची नुकसान भरपाई देण्यासाठी मुल्यांकन जाहीर केले आहे.

मात्र नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्तेचे मुल्यांकन ग्रामीण भागा पेक्षा कमी दराने होत असल्याचा संबधित विस्थापितांचा दावा आहे. नगरपंचायत क्षेत्रातील विस्थापितांनाही ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच मुल्यांकन दर द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यामागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत क्षेत्रातल चौपदरीकरण ग्रस्त विविध मार्गानी आंदोलने करत आहेत. कोकणातील  पदरीकरणग्रस्तांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सर्व पक्षीय आमदार या प्रश्‍नी आपआपल्या स्तरावर यासनाकडे पाठपुरावा करत आहेत.   

या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व कणकवली व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायत क्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66च्या चौपदरीकरणामुळे विस्थापितांना ग्रामीण ग्रामापंचायत क्षेत्रातील गुणांकाप्रमाणे मोबदला मिळालाच पाहिजे यासाठी कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाचे आ.वैभव नाईक यांच्यासह आ. राजन साळवी, आ. भरतशेठ गोगावले, आ. सदानंद चव्हाण, आ.
 सुनील शिंदे, आ. मंगेश कुडाळकर, आ.अशोक पाटील, आ. मंगेश कुडाळकर, आ. प्रकाश फातर्पेकर, आ.मनोहर भोईर यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधानभवन समोर केले. 

धरणे आंदोलनाची दाखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच यासंदर्भात मागणीच्या अनुषंगाने सदर बाबत सकारात्मक बदल करण्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन या आमदारांना दिले.