होमपेज › Konkan › गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आजपासून ‘गाव तेथे शाखा’

गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आजपासून ‘गाव तेथे शाखा’

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:53PM शृंगारतळी : वार्ताहर

‘गाव तेथे शाखा’ अशी राष्ट्रवादी युवक काँगे्रसने राज्यभर मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. रविवार दि. 4 फेबु्रवारी रोजी गुहागर तालुक्यातील 10 गावांतून यानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात आ. भास्कर जाधव यांसह पक्षाचे राज्यपातळीवरील नेते सहभागी होणार आहेत.

प्रत्येक गावात, घरात राष्ट्रवादी पोहोचण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये गुहागर तालुका राष्ट्रवादी युवक काँगे्रस आघाडीवर असून पक्षातर्फे ‘गाव तेथे शाखा’ कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम जाहीर झाले आहेत. 4 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजता देवघर, 10.30 वाजता गिमवी, 11  वा.  जानवळे, 12 वा.  रानवी, 12.30 अंजनवेल, 2.15 आरे-वाकी-पिंपळवट, 2.30 वा. गुहागर मोहल्ला, 2.45 वा. गुहागर वरचापाट, 3.15 वा. गुहागर गुरववाडी, 3.30 वा. गुहागर बौद्धवाडी, 3.45 वा. गुहागर खालचापाट, तसेच 4 वाजता गुहागर भंडारी भवन येथे सभा आयोजित करण्यात आली  आहे. 

या उपक्रमात आ. भास्कर जाधव, महाराष्ट्र युवक निरीक्षक गोरखनाथ नलावडे, महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष बाळासाहेब म्हामुणकर, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. चाळके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, जि. प. सदस्य व विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आदी सहभागी होणार आहेत.