Mon, Oct 21, 2019 03:24होमपेज › Konkan › ‘कोकण पदवीधर’च्या रिंगणात राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला?

‘कोकण पदवीधर’च्या रिंगणात राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला?

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 30 2018 11:49PMलांजा : प्रतिनिधी 

कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि कोकण बँकेचे चेअरमन  नजीब मुल्ला यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 
पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी निरंजन डावखरे यांनी निवडणूक लढविलेली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात यश मिळविले होते. परंतु, डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या नावावर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये नजीब मुल्ला यांना वरिष्ठ नेत्यांनी पसंती दिली आहे.

नजीब मुल्ला हे गेल्या चार वेळेपासून ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक असून त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम त्यातच राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष  आणि कुशल संघटक म्हणून केलेले काम लोकांशी संपर्क असल्याने पक्ष या कुशल नेतृवावर ही जवाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे. याबरोबर कोकण बँकेचे ते विद्यमान चेअरमन असून या माध्यमातून  ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण डोंबिवली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  या जिल्ह्यांत बँकेचे जाळे विणले गेले आहे.  मुल्ला हे जितेंद्र आव्हाड याचे  निकटवर्तीय असल्याने तेही मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत. 
  WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19