Mon, Jan 27, 2020 12:33होमपेज › Konkan › रुखीमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

रुखीमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Published On: Dec 27 2018 1:19AM | Last Updated: Dec 27 2018 12:59AM
दापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील रुखी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.
रुखी गावचे शाखाप्रमुख संतोष मांडवकर, सरपंच प्राची मांडवकर, गाव गटप्रमुख संजीव बालगुडे, उपविभाग प्रमुख संदीप मांडवकर यांच्या प्रयत्नातून रुखी बौद्धवाडीतील विनायक तांबे, संदीप तांबे, सुमित जाधव, सुशांत तांबे, प्रदीप जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. रुखी गावातील फणसवाडी रस्ता डांबरीकरण (5 लाख रुपये) आणि रुखी मोहल्ला ते संगलट रस्ता (15 लाख रुपये) आदी जिल्हा नियोजनमधील कामांचे भूमीपूजन  योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

यावेळी योगेश कदम यांनी सांगितले की,  शिवसेनेच्या माध्यमातून दीड  वर्षात दापोली मतदारसंघात 11 कोटींचा निधी खर्च पडला आहे. विरोधकांची मते मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. ना. रामदास कदम यांच्यामुळे लोकांना आ. संजय कदम हे कळले आहेत. मागील निवडणुकीत मी रामदास कदम यांचा भाऊ आहे, असे सांगून त्यांनी मते मागितली. त्यामुळे या वेळेस अशा भूलथापांना बळी पडू नका. विरोधक हे स्वतःच्या खडी क्रशरवरील खडी कोणतीही प्रशासकीय मंजुरी नसताना टाकून निकृष्ट दर्जाचे रस्ते करीत आहेत. दापोली मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून ज्या कामाचे नारळ फुटले त्या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी आहे. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा. राजकुमार धूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या फंडातून दापोली मतदारसंघात 13 कोटींचा निधी आला आहे. आमदारांकडे एवढा निधी नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांची अनामत रक्‍कम जप्‍त होऊ द्या, असे  योगेश कदम यांनी सांगितले.

यावेळी दापोली संपर्कप्रमुख दादा गोवले, युवा अधिकारी सुमित जाधव, रुखी उपशाखा प्रमुख दत्ताराम मांडवकर,युवा अधिकारी सिद्धेश भागणे, सुशील भागणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.