Sat, Jul 20, 2019 21:51होमपेज › Konkan › चाकरमान्यांना संघटित करण्याचे काम कौतुकास्पद

चाकरमान्यांना संघटित करण्याचे काम कौतुकास्पद

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:01PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील लोकांना एकत्र करण्याचे काम दोडामार्ग तालुका विकास मंडळ करत असून मुंबई, ठाणे ते पनवेलपासून कल्याणपर्यंत राहणार्‍या दोडामार्गवासिय चाकरमान्यांना एकत्र आणण्याचे मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार  खा. विनायक राऊत यांनी काढले. दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई यांचा स्नेहमेळावा व विद्यार्थी गुण गौरव समारंभ दादर येथे मराठा ग्रंथालयातील सुरेंद्र गावसकर सभागृह रविवारी झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  खा.राऊत बोलत होते. दोडामार्ग पं. स. उपसभापती सुनंदा धर्णे, केर भेकुर्ली माजी सरपंच व जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई, हेवाळे सरपंच संदीप देसाई, मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल गवस, संस्थापक भगवान रेडकर, माजी अध्यक्ष प्रकाश रेडकर, कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर, सचिव अशोक दळवी, कोषाध्यक्ष विजयानंद सावंत, उपाध्यक्ष संदीप धर्णे, गुणाजी सावंत, तसेच  रमाकांत रेडकर, सहदेव गवस, आप्पा वेटे, विष्णू सावंत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

ग्रामविकासात सर्वोच्च काम करणार्‍या हेवाळे सरपंच संदीप देसाई व केर सरपंच प्रेमानंद देसाई तसेच चाकरमानी उद्योजक व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इतर पदवीधरांचा गुणगौरव खा.राऊत  यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार तुळशीदास नाईक, मोहन गवस, भारतीय कामगार सेना प्रतिनिधी पूजा शिंदे, मोहन गवस, एकनाथ गवस, पुंडलिक गावडे, तुळशीदास सावंत, राजन नांगरे, अशोक दळवी, कांचन गवस, देवानंद मणेरीकर, अशोक दळवी, प्रकाश कदम ,भगवान गवस, संदिप धर्णे, केशव धाऊसकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात  आला. 
केर माजी  सरपंच प्रेमानंद देसाई यांनी गावचा विकास करायचा असेल मानसिकता बदलली पाहिजे.

मुंबई चाकरमान्यांचे योगदान जर प्रत्येक गावाला मिळाले व समस्यांचा पाठपुरावा केला तर दोडामार्गमधील एकही गाव विकासा पासून दूर राहाणार नाही, असे सांगितले. तर हेवाळे सरपंच संदीप देसाई यांनी गाव विकासाची संकल्पना आपण कशा प्रकारे करू शकतो याचे उदाहरण देत जर प्रत्येक गाव विकास प्रक्रियेत येण्यासाठी नेटवर्कने गावे प्रथम जोडली पाहिजेत.त्यासाठी दोडामार्ग विकास मंडळाने लक्ष घातल्यास दोडामार्ग तालुका डिजिटलने जोडणारा पहिला तालुका असेल, असा विश्‍वास व्यक्त केला.सुत्रसंचालन वासुदेव वर्णेकर तर आभार कोषाध्यक्ष विजयानंद सावंत यांनी मानले.