Sat, Nov 17, 2018 16:49होमपेज › Konkan › जमीन मोबदल्याचे सव्वाशे कोटी अडकले तांत्रिक जंजाळात!

जमीन मोबदल्याचे सव्वाशे कोटी अडकले तांत्रिक जंजाळात!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमीन मोबदला वितरणात मालक-कूळ वाद, वारसातील  वाद, अभिलेखातील चुका, खासगी वने नोंदीचे सातबारा यासारख्या  विविध कारणांमुळे कुडाळ विभागातील 2 हजार 608 खातेदारांचे 124 कोटी 65 लाख रू. अडकून पडले आहेत, अशी माहिती कुडाळ तालुका भूसंपादन विभागातून देण्यात आली.

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन व जमीन मोबदला प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. कुडाळ विभागातील  18 गावांसाठी 388 कोटी 67 लाख रु. प्राप्त झाले असून त्यापैकी 264 कोटी 22 लाख रुपयांचे आतापर्यंत वितरण पूर्ण झाले आहे. 73.6 हेक्टर पैकी 59.49 हेक्टरचे जमीन संपादन ही पूर्ण झाले आहे.  मात्र, काही  ठिकाणी मालक कुळ वाद, वारसातील वाद असे विषय वितरणामध्ये अडथळा  ठरत आहेत. कुडाळ विभागात  मालक कुळ असे 273 लोकांमध्ये  वाद असून त्यासाठीचे 10.48 अडकून राहिले आहेत. 

वारसातील वादाची  357 भूधारकांचे 36 कोटी 62 लाख रु. अभिलेखात असलेल्या चुकांमुळे 145 भूधारकांचे 9 कोटी 87 लाख अडकले आहेत.  तर काही लोकांचे  खाते नंबर व प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्राप्त झालेले नाहीत अशा 439 लोकांचे  24 कोटी 81 लाख रू. अडकले आहेत. ज्या लोकांनी नोटिसा स्वीकारल्या नाहीत अशा 1 हजार 335 लोकांचे 32 कोटी 70 लाख तर ज्या क्षेत्रावर खासगी वने अशी नोंद  आहे असे 63 भूधारकांचे 9 कोटी 97 लाख रू. शासन दरबारी अडकले आहेत.  

भूसंपादन व मोबदला वितरण प्रक्रिया  शेवटच्या टप्प्यात  आली असताना यासारख्या काही विषयांमुळे  या कामात व्यत्यय येत आहे. हे वाद तडजोड व  अन्य प्रक्रियेतून मिटल्यावरच आता शेवटच्या टप्प्याला गती मिळणार आहे. काही भूधारकांची थ्रीडी नुकतीच  प्रसिध्द झाली आहे अशा भूधारकांना  निवाडा जाहीर करण्याचे काम येत्या 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कुडाळ  भूसंपादन विभागाने समोर ठेवले आहे. 

या निवाड्याअंती  त्यांच्या मालमत्तेचे  मुल्यांकन होणार असून तशी आवश्यक तेवढी रक्‍कम परत शासनाकडून मागविण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ भूसंपादन विभागातून देण्यात आली आहे. 

Tags : Mumbai Goa highway issue Land paid distribution Owner family dispute


  •