Wed, Mar 27, 2019 04:34होमपेज › Konkan › रिफायनरीविरोधात मुंबईत आंदोलनाच्या हालचाली

रिफायनरीविरोधात मुंबईत आंदोलनाच्या हालचाली

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:13PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पावरुन जोरदार रणकंदन सुरु असतानाच मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शासनाचे लक्ष पुन्हा  वेधण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे वृत्त आहे. मात्र , त्याचे स्वरुप निश्‍चित झालेले नाही.

गेले काही महिने रिफायनरी प्रकल्पावरुन जोरदार संघर्ष सुरु आहे. त्याचे पडसाद थेट अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पहायला मिळाले आहेत. आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पण प्रकल्प रद्द होण्याबाबत कोणताच निर्णय शासन घेत नसल्याने आता पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मुंबईत प्रकल्पविरोधी आंदोलन छेडण्याची तयारी प्रकल्प विरोधी समितीकडून सुरु असल्याचे वृत्त आहे. पण,  त्याचा तपशील  मात्र  पुढे आलेला नाही . त्यामुळे हे आंदोलन कशा प्रकारचे असेल हे निश्‍चित झालेले नाही.