Wed, Nov 21, 2018 13:16होमपेज › Konkan › आयएमईआय नंबरवरून मोबाईल चोरीचा छडा

आयएमईआय नंबरवरून मोबाईल चोरीचा छडा

Published On: Jan 18 2018 8:38PM | Last Updated: Jan 18 2018 8:38PMकुडाळ : राजाराम परब

चोरीस गेलेल्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकावरून संशयित मोबाईल चोरटा दामोदर राधाकृष्ण सामंत (वय-३८, रा. वायगंणी हरिचरणगिरी) यास कुडाळ पोलिसांनी अटक केली. आयएमईआय क्रमांकावरून या हरवलेल्या मोबाईलचा व संशयिताचा शोध कुडाळ पोलिसांनी लावला.

याबाबत अधिक माहिती अशी, सुनील दत्ताराम घाटकर (रा. वेताळ बांबर्डे) यांचा स्मार्ट फोन दुकानातुन चोरीस गेला होता. घाटकर यांनी यासंबंधीची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारी नुसार कुडाळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. या मोबाईल चोराचा शोध कुडाळ पोलिस मोबाईलचा आयएमईआय क्रमांकावरून घेत होते. 

दरम्यान या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकावरून या चोरीच्या मोबाईलचे लोकेशन कुडाळ पोलिसांना मिळाले. या लोकेशन नुसार शोध घेत असताना हा मोबाईल वायगंणी हरिचरणगिरी येथील दामोदर सामंत यांच्याकडे मिळाला. कुडाळ पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणुन सामंत यांना अटक केली. दामोदर सामंत हा त्यादिवशी चिकन नेण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईलही हस्तगत करून त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केला.