Wed, Sep 19, 2018 12:34होमपेज › Konkan › रत्नागिरीत अल्पवयीन युवतीची आत्महत्या

रत्नागिरीत अल्पवयीन युवतीची आत्महत्या

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:48PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अल्पवयीन युवतीने राहत्या घरी  छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री 8 वा. सुमारास  शहरातील थिबा पॅलेस रोड येथील पॉलिटेक्निक वसाहतीत घडली. या घटनेतील युवतीच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

स्वाती रवींद्र मोहिते (वय 17, रा. पॉलिटेक्निक वसाहत, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन युवतीचे नाव  आहे. याबाबत मंदार सुनील पवार (30, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार शनिवारी रात्री 8 वा. सुमारास घरी कोणीही नसताना स्वातीने ओढणीच्या साहाय्याने सीलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची माहिती मिळताच  शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत अधिक तपास पोलिस हेडकाँस्टेबल कोकरे करत आहेत.