Sun, Jan 19, 2020 21:48होमपेज › Konkan › सावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

सावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:33AMसावंतवाडी : प्रतिनिधी 

मध्यरात्री  राजरत्न कॉम्प्लेक्स व सालईवाड्यातील भर वस्तीतील दोन सदनिकातील तब्बल पाचजणांचे फ्लॅटस् फोडून आतील रोख रक्‍कम व किमती चीजवस्तूंच्या चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.

याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांत शिक्षक प्रतापराव देसाई यांनी तक्रार दिली आहे. या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये चोरी करताना कैद झाल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक असे फ्लॅट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

ही चोरीची घटना शुक्रवारी मध्यरात्री 2.45 वाजताच्या सुमारास घडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे आहे.सालईवाडा येथील राजरत्न कॉम्पलेक्स या निवासी संकुलामधील डी विंग मधील प्रतापराव देसाई यांचा प्लँटचा पत्रा कटावणीने उचकटुन कटरने  कापला व आत प्रवेश केला.आतील रोख पाचशे रुपये लंपास केले.या व्यतिरिक्‍त चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ए विंग मधील विष्णू घाडी व रवींद्र गोयल या तिघांचे फ्लॅट चोरट्यांनी एकापाठोपाठ फोडले  त्यांनी सामान उचकटविले  परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. यातील रवींद्र गोयल यांनी फ्लॅटची नुकतीच खरेदी करुन ताबा मिळविला होता त्यांनी आपले सामान शिफ्ट न केल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.विष्णू घाडींच्या फ्लँटमध्ये चोरट्यांनी ड्रॉवर्स तपासले परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. दरम्यानच्या काळात मिलाग्रीस चर्च जवळील ज्युलेट हाऊसिंग सोसायटी ह्या  निवासी संकुलातील प्रवीण वाडिया,दीपक जोशी यांचेही दोन फ्लँट फोडण्याचा प्रयत्न केला.परंतू यातही चोरट्यांच्या हाती काही आलेले नाही.

दरम्यान, या पाच फ्लँट चोरीपैकी राजरत्नमधील तिघांच्या फ्लँट फोडीचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरटे दोघेजण असून ते तयारीनिशी आले होते त्यांच्या हातात कटर, कचावणी आदी हत्यारे दिसत आहेत. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस हेड. कॉ.संजय हुंबे सह पोलिस नाईक राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. हे चोरटे परराज्यातील व सराईत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या भरस्तीतील चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असुन पोलीसांनी मध्यरात्रौची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.