Fri, Jan 24, 2020 21:49होमपेज › Konkan › वटपौर्णिमा : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे

वटपौर्णिमा : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे

Published On: Jun 16 2019 2:08PM | Last Updated: Jun 16 2019 5:42PM

कुडाळ : वटवृक्षाचे पुजन करताना उमेश गाळवणकर, डॉ.संजय निगुडकर, प्राचार्य अरूण मर्गज व इतर.(छाया : काशिराम गायकवाड,कुडाळ)कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ येथे रविवारी पुरूष मंडळींनी वटपौर्णिमा साजरी केली. पुरूषांच्या या उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. सुहासिनी महीलांप्रमाणेच जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, तिला निरोगी दीर्घायुष्य मिळावे अशी भावना यावेळी पुरूष मंडळींनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गेली आठ वर्षे पुरूष मंडळी एकत्र येऊन अनोखी प्रथा जोपासत आहेत.

येथील श्री देव गवळदेव मंदिर जवळील वटवृक्षाची पूजा करून या वृक्षाला सुताने गुंडाळून सात फेरे मारले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले उमेश गाळवणकर व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ.संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा केला जातो. 

यावेळी उमेश गाळवणकर,  डॉ.संजय निगुडकर,  प्राचार्य अरूण मर्गज,  सिद्धेश गाळवणकर, व्यंकटेश भंडारी, बळीराम जांभळे, किरण करंदीकर,  प्रा.नितीन बांबर्डेकर, शांताराम गांवकर, संतोष पडते,  सुरेश वरक आदींसह पुरूष मंडळींनी या उपक्रमात सहभाग घेतला. दरम्यान कुडाळ तालुक्यात महिलावर्गाने वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.