Wed, Apr 24, 2019 12:21होमपेज › Konkan › दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात बैठक

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात बैठक

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:32PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार्‍या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सुरळीत, शांततेत, कॉपीमुक्‍त व तणावविरहीत  होण्यासाठी तसेच परीक्षापूर्व, परीक्षा कालावधीत व परीक्षोत्तर कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांची सहविचार बैठक जिल्ह्यात तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात द्यायच्या सूचना यावर विचारविनिमय होणार आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्‍वर या तालुक्यांसाठी आर. बी. शिर्के प्रशालेत दि. 17 रोजी सकाळी 10.30 वा., चिपळूण आणि गुहागर तालुक्यांसाठी दि. 18 रोजी सकाळी 10.30 वा. डीबीजे कॉलेज चिपळूण येथे तर मंडणगड, दापोली, खेड तालुक्यांसाठी नवभारत हायस्कूल, भरणे, ता. खेड येथे दि. 19 रोजी सकाळ 10.30 वा. ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्याध्यापक, प्रचार्य व केंद्रप्रमुख यांनी स्वतः उपस्थित रहायचे आहे. प्रतिनिधी पाठवू नये, असे आवाहन रमेश गिरी विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांनी केले आहे.