Wed, Dec 11, 2019 11:43होमपेज › Konkan › रत्नागिरीत आज खासगी रुग्णालयांची वैद्यकीय सेवा बंद

रत्नागिरीत आज खासगी रुग्णालयांची वैद्यकीय सेवा बंद

Published On: Jun 17 2019 2:10AM | Last Updated: Jun 17 2019 2:10AM
रत्नागिरी : पश्‍चिम बंगालमधील आंदोलनकर्त्या डॉक्टर्सना पाठिंबा दर्शवण्यासाठी  सोमवारी जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये काळ्या फिती लावून बंगालमधील डॉक्टरांना पाठिंबा दर्शवला जात आहे.

बंगालमधील शासकीय रुग्णालयातील दोघा डॉक्टर्सना रुग्णाच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या निषेधार्थ तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले  आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांना सुरक्षा देण्याची मागणी या आंदोलनाद्वारे केली जात आहे. संपूर्ण देशातून डॉक्टर्सच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स काळ्या फिती लावून पाठिंबा देत आहेत. त्याचवेळी सोमवारी खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.