Thu, Jan 17, 2019 19:27होमपेज › Konkan › आघाडी अन् युती शासनाकडूनही शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग 

आघाडी अन् युती शासनाकडूनही शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

काँग्रेस आघाडी  सरकारने अवलंबलेले शेतकरी विरोधी धोरण याही सरकारने कायम ठेवले आहे. या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षांना या सरकारने तिलांजली दिली आहे. केवळ मोठमोठ्या घोषणांपलीकडे या सरकारने काहीही केले नाही. शेतकर्‍यांना हमीभाव आणि आणि सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या चाळीस संघटना एकत्र येत 23 मार्च पासून ‘शहीद अभिवादन शेतकरी जागृती’ यात्रा सुरू केली असून ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगाव जिल्ह्यात जाणार आहे. या यात्रेत सुमारे 500 सभा घेऊन या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती शेतकरी समन्वय समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

23 मार्च रोजी पासून सांगली येथून राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहिद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरु झाली असून ही यात्रा सोमवारी सिंधुदुर्गात सिंधुदुर्गनगरी येथे दाखल झाली यावेळी श्री. पाटील हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक किशोर धमाले, दीपक जाधव, आम आदमीचे डॉ. विलास सावंत, समन्वयक नैना कुराडे, विवेक राणे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रातिसिंह मासाहेब पाटील यांच्या गावातून सुरू केलेली ही जागरयात्रा सोमवारी सिंधुदुर्गनगरीत दाखल झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जागर सभा झाली. 19 मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. सरकारकडून शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी व शेतमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. मात्र अगोदरच्या सरकारने काय  किंवा या सरकारने काय शेतकर्‍यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात  होणार्‍या शेतकरी आत्महत्या हा असल्याचा आरोप रघुनाथदादांनी केला.

भारताचे धोरण आज शेतमाल निर्यात बंदीचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन घेऊनही आपल्या मालाला दर घेता येत नाही. भारतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्माण होतो. मात्र, त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. उलट शेतकरी मात्र, डिझेल म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा सर्वाधिक थेट कर सरकारला भरत असतो. कर्जमाफी जाहीर केली गेली. मात्र, त्यातही एवढा घोळ घातला गेला की शेतकर्‍यांच्या हाती निराशाच आली. त्याचेच पर्यावसान अजूनही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे. यासाठी सरसकट कर्जमाफी ही आमची आग्रही मागणी आहे. 

या जगात यात्रेच्या शेवटी 30 एप्रिलला शासनाच्या शेतकरी धोरण विरोधात सविनय कायदेभंग म्हणून जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील तुरुंग अपुरे पडतील.

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Martyr Greetings Farmer Jagruti Yatra, 


  •