Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Konkan › सागरी सुरक्षा होणार बळकट

सागरी सुरक्षा होणार बळकट

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:12PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

कोकण किनारपट्टी भागात सागरी सुरक्षिततेला महत्त्व देताना तटरक्षक दलातर्फे भाट्ये येथे तटरक्षक दलाच्या जागेत 4  हॉवरक्राफ्ट तैनात करण्यात येणार आहेत. जमिनीवर व समुद्रातही वापर करता येणार्‍या या हॉवरक्राफ्टमुळे सागरी सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. भगवती बंदर येथे टेहळणी  केंद्रही उभारण्यात येणार आहे. या दोन्ही प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती येथील प्रशासकीय सूत्रांनी दिली.

रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथे एमआयडीसीमध्ये तटरक्षक दलातर्फे विमानतळाचे कामकाज सुरू असून 2018 मध्ये या विमानतळावरून प्रवासी वाहतूक प्रस्तावित आहे. तटरक्षक दलाच्या या तळाबरोबरच सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शहरानजीक असलेल्या भाट्ये किनार्‍यावर तटरक्षक दलातर्फे 4  हॉवरक्राफ्ट तैनात करण्यात येणार आहे. यामुळे सागरी किनार्‍याच्या सुरक्षिततेची पडताळणी सागरी, भूपृष्ट अशा स्तरांवर अधिक मजबूत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर भगवती बंदरजवळ तटरक्षक दलातर्फे टेहळणी केंद्र उभारण्यात येणार  आहे. या दोन्ही प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भाट्ये आणि भगवती बंदर या दोन्ही ठिकाणी तटरक्षक दलाची आरक्षित जागा असून या जागांवर हे प्रस्ताव प्रस्तावित केले आहेत. अलीकडेच प्रशासनातर्फे जागेची तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी करण्यात आली.