Wed, Apr 24, 2019 19:27होमपेज › Konkan › संगमेश्‍वरात आज मॅरेथॉन स्पर्धा

संगमेश्‍वरात आज मॅरेथॉन स्पर्धा

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 11:02PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय तसेच मराठी पत्रकार परिषद संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 रोजी  नवनिर्माण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांची उपस्थिती लााणार आहे. 

पत्रकार दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धा 16 वर्षाखालील मुलगे व मुली तसेच खुल्या गटात महिला व पुरूष अशा चार गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातून 3 विजेत्यांची निवड करून त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून दोन उत्तेजनार्थांची निवड करून आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी चौक येथून सकाळी 8 वा. स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाला रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, मराठी पत्रकार परिषदेचे तालुकहध्यक्ष सुरेश सप्रे यांची उपस्थिती लााणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वरचे तहसीलदार संदिप कदम, संगमेश्वरचे पोलिस निरिक्षक महेश थिटे, देवरूखचे पोलिस निरिक्षक शिवाजी पाटील यांसह तालुक्यातील जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. 

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहाागी व्हावे, तमाम तालुकावासियांनी या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे करण्यात आले आहे.