Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Konkan › पनवेल बैठकीत पुन्हा आंदोलनाचा इशारा

२६ फेब्रुवारीला विधानभवनाला मराठयांचा घेराव..!

Published On: Dec 25 2017 7:40PM | Last Updated: Dec 25 2017 7:40PM

बुकमार्क करा

पनवेल : विक्रम बाबर

मराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरला आहे. येत्या १० फेब्रुवारी पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ फेब्रुवारी रोजी  मराठा समाज रस्त्यावर उतरून विधानभवनाला  घेराव  घालेल अशी घोषणा पनवेल येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आली. पहिले आंदोलन हे शांततेत झाले या नंतर चे आंदोलन ही वेगळे असतील असा समज देखील या बैठकी दरमान्य देण्यात आला आहे.

मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागणीसाठी जिल्हा आणि तालुक्यात शांततेने आंदोलन काढून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले मात्र त्या नंतर शेवटचे आंदोलन मुबई मध्ये काढून मागण्या मान्य करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला. मात्र मुबई येथील आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ आश्वासन देण्याचे काम केले, मात्र त्याची पूर्तता केली नाही.

यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज पनवेल येथील के.व्ही.कन्या स्कूल येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. याबैठकीस राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागील आंदोलनावर चर्चा करण्यात आली तसेच कोपर्डी येथील घडलेल्या कृत्या बाबात आरोपीना फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल उपस्थितानी समाधान व्यक्त केले. व मराठा समाजाने ज्या मागण्यांसाठी आंदोलन केली त्या मागण्यावर पुन्हा चर्चा करण्यात आली, तर या बैठकी दरम्यान पाच ठराव पारित करून एक मुखाने निर्णय घेण्यात आले.

याबैठकीत छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती राज्यात केवळ १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात यावी यासंबंधी निर्णय घेण्यात आला. तर १९ फेब्रुवारी पासून आंदोलनाला सुरवात करून २६ फेब्रुवारी रोजी अधिवेशन सुरु असताना विधान भवनाला घेराव घालण्याचा ठराव घेण्यात आला. 

सरकारने या प्रश्नावर १० फेब्रुवारी पर्यत आपला निर्णय जाहीर करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच जळगाव येथे पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्याचा ठराव पास करण्यात आला. 

मराठी शाळा पुन्हा सुरु कराव्यात

राज्य शासनाने, पटसंख्या कमी असल्याचे कारण देत राज्यातील १३५० मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्या साठी लढा देण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. आणि या शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.