Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Konkan › छत्रपतींना अभिप्रेत काम करा : वैभव नाईक

छत्रपतींना अभिप्रेत काम करा : वैभव नाईक

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:28PMकुडाळ : प्रतिनिधी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत  छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना केली.  शिवजयंती दिनी आपण  सर्वजण त्यांच्या कार्याचा गौरव करतो, पण खर्‍या अर्थाने आपण  सर्वांनी छत्रपतींना अभिप्रेत  असलेले काम केले तरच  त्यांचा शिवजयंती कार्यक्रम सार्थकी होईल. त्यासाठी सर्वांनी छत्रपतींना अभिप्रेत  असलेल्या कामासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले. यावेळी मराठा लाइट इंन्फ्रटीच्या शहीद वीरांना आ. नाईक यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

कुडाळ येथील जिजामाता चौकात सोमवारी  हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत, प.पू. गावडेकाका महाराज, सुनील पवार, सभापती राजन जाधव, धीरज परब, राजु राऊळ, अमरसेन सावंत, संग्राम सावंत, बाळकृष्ण परब, बंड्या सावंत, सौ. अनुजा  सावंत, सचिन काळप, शैलेश घोगळे, सौ. संध्या तेरसे, अ‍ॅड. नीलांगी रांगणेकर, चंद्रशेखर  जोशी आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सावंत यांनी शिवरायांचा आदर्श मानणार्‍या व मराठा  युध्द कौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणार्‍या मराठा लाईफ इन्फंट्रीला 250 वर्ष पूर्ण झाली त्याबाबत  माहिती देत या विराचे स्मरण करण्याची गरज असल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे शिवजयंतीचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने कुडाळ जिजामाता चौकात वीराची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरातील मूर्तीची पूजा करून तेथून मार्गस्थ झालेल्या शिवज्योतीचे कुडाळात प.पू. गावडे काका महाराज यांच्या हस्ते कुडाळ कॉलेज येथे जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. कुडाळ जिजामाता चौक येथून कुडाळ बाजारपेठेत  शिवज्योत मार्गस्थ झाली. यादरम्यान जिजाऊ व शिवरायांच्या पुतळ्याला  मानवंदना देवून ज्योत पुढे मार्गस्थ झाली.