Fri, May 24, 2019 20:54होमपेज › Konkan › प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने प्राजक्ताची आत्महत्या

प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने प्राजक्ताची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


माणगांव ; वार्ताहर

हळदीचे नेरूर विद्यालयातील इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी कु.प्राजक्ता पवार हिच्या प्रेमसंबंधाला घरच्यांनी विरोध दर्शविल्यामुळे तिने दबावाखाली आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत सोमवारी पोलिस निरीक्षक अविनाश  भोसले यांनी या प्रशालेत भेट देत विद्यार्थी व संबंधितांचे जबाब घेतले. या आत्महत्येप्रकरणी अजूनही कुणाविषयी संशय असेल  किंवा माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन भोसले यांनी केले.

 प्राजक्ता पवार हिने शनिवार  8 नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी पाच पानी पत्र लिहून त्यात आत्महत्येस कारणीभूत असलेल्या मैत्रिणीच्या नावाचा उल्लेख केला होता. सदर मैत्रिणेने संस्थेकडे आपणाला व प्राजक्ताला त्रास देत असलेल्या व्यक्तींची नावेही तक्रार  अर्जात नमूद केली होती. पोलिस निरीक्षक अविनाश भोसले, महिला पोलिस शिंगारे, राऊळ, माणगांव आऊट पोस्टचे विजय चव्हाण आदींनी  संस्थाध्यक्ष बाळ सावंत यांच्या उपस्थितीत प्राजक्ताच्या वर्गातील विद्यार्थीनी व महिला शिक्षक यांचे जबाब घेतले. यापूर्वी प्राजक्ताची आजी, मामा, मामी व आई-वडिल यांचे जबाब घेण्यात आले होते.

या सर्व जबाबाच्या अनुषंगाने  प्राजक्ताने  प्रेमसंबंधाला घरातील मंडळींचा विरोध असल्याने आत्महत्या केली असल्याचा निकर्ष पोलिस तपासात उघड झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्राजक्ताला त्रास दिल्याची चर्चा होती त्या सर्वांचे जबाब सोमवारी घेण्यात आले असून प्राजक्ताने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र, तिच्या मैत्रिणीने दिलेला तक्रार अर्ज आदींची खातरजमा करण्यात आली असून ज्या तिघांविरूध्द प्राजक्ताच्या मैत्रीणीने तक्रार दिली त्याबाबत पोलिसांना तिने सोमवारी तक्रार नसल्याचे सांगितल्याने आई-वडिलांना घेवून तिला पोलिस स्टेशनला जबाबासाठी येण्याचे सांगण्यात आले आहे.