Sun, Jun 16, 2019 02:51होमपेज › Konkan › रायगड जिल्ह्यात माणगावात स्फोटकांचा साठा हस्तगत

रायगड जिल्ह्यात माणगावात स्फोटकांचा साठा हस्तगत

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 10:27PMमाणगाव : कमलाकर होवाळ   

माणगाव तालुक्यात ढाळघर गावात डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या साहाय्याने स्फोटक बनविण्याचे कारस्थान पोलिसांनी हाणून पाडले आहे. याप्रकरणी नूर महम्मद हुमर जहीर काजी याला पोलिसांनी अटक केली. 945 डिटोनेटर्स व 46 जिलेटीन कांड्या असा स्फोटकांचा साठा घरातून जप्त करण्यात आला आहे.

माणगाव तालुक्यातील रिळे येथे शेतामध्ये अज्ञात आरोपीने निष्काळजीपणे स्फोटकसदृश वस्तू ठेवल्याने त्याला स्पर्श केला असता दोघेजण जखमी झाल्याची घटना दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. फिर्यादी रवींद्र कृष्णा जाधव (वय 19) याच्या मालकीच्या शेतात ही घटना घडली. 

माणगाव तालुक्यातील ढाळघर येथे दत्ताराम तेटगुरे यांची चाळ आहे. या चाळीत भाड्याने काही भाडोत्री राहतात. तेटगुरे यांच्या दोन नंबरच्या खोलीत नूर महम्मद काजी हा राहत होता. चाळीत काहीतरी स्फोटक बनवीत असल्याची खबर खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून माणगाव पोलिसांनी तेटगुरे यांच्या चाळीतील 2 नंबर खोलीत धाड टाकली असता नूर महम्मद काजी हा स्फोटके बनवत असल्याचे समोर आले. बिडीडीएसमार्फत रूमची तपासणी केली असता त्या ठिकाणी 965 इडी कॅप खाकी रंगाचे कागदी अवरणामध्ये रबराने बंद केलेल्या स्थितीत, 46 कांड्या त्यावर पावर 90 इंग्रजीमध्ये इमुलेशन एक्सप्लोझिव्ह 25 बाय 125 ग्रॅम, एक प्लास्टिक निळ्या रंगाचा 50 लिटरचा ड्रम, एक नायलॉनची रिकामी अंदाजे 50 किलोची गोणी, असा मुद्देमाल मिळून आला असून, तो जप्त करण्यात आला आहे.