Mon, Aug 19, 2019 18:45होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, कारचालक ठार (Video)

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, कारचालक ठार (Video)

Published On: Apr 22 2018 11:49AM | Last Updated: Apr 22 2018 1:08PMरत्नागिरी : पुढारी ऑनलाईन

मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळून  सीता निवासजवळ कार आणि खासगी आराम बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना लाइफ केअर येथील रुगणालायत दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक कही काळासाठी ठप्प झाली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीता निवासजवळ झालेल्या अपघातात इंडिका कार चालक जागीच ठार झाला. कार जाकादेवी येथील तर खाजगी बसही श्रद्धा ट्रॅवल्सची होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  याप्रकरणी बस चालकाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.  

Tags : Man Killed, Car And Bus Accident, Mumbai Goa Highway, Ratnagir