Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Konkan › सिंधुदुर्गवासीयांसाठी एसटीची ‘शिवशाही’ सेवा

सिंधुदुर्गवासीयांसाठी एसटीची ‘शिवशाही’ सेवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण :  वार्ताहर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील ‘शिवशाही’ या वातानुकूलित आलिशान बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. मालवण-पुणे-निगडी व सावंतवाडी-पुणे  या जिल्ह्यातील पहिल्या शिवशाही बस फेर्‍यांचा शुभारंभ बुधवार 29 नोव्हेंबर सायंकाळी 4.30 वा. मालवण आगारात पालकमंत्री दीपक केसरकर व आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी दिली.

प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा आनंद लुटता यावा, यासाठी  एसटी महामंडळाच्या ताब्यात शिवशाही या आलिशान बसेस आल्या आहेत. या बसमध्ये एकूण 45 पुशबॅक आसने असून ही बस वातानुकूलित आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक साटमागे एलसीडी टीव्ही स्क्रीन बसविण्यात आली आहे. वाय-फाय सुविधा, पूर्ण वातानुकूलित फायर डिटेक्टिंग सिस्टीम, मोबाईल चार्जिंग अशा आधुनिक व अत्यावश्यक सेवा या बसमध्ये उपलब्ध आहेत.  संकटकाळी अलर्ट सेन्सर व सीसीटीव्हीची नजर ही या बसमध्ये आहे.