Tue, Mar 26, 2019 07:41होमपेज › Konkan › नेमबाज स्पर्धेत मालवणच्या स्पर्धकांची कामगिरी

नेमबाज स्पर्धेत मालवणच्या स्पर्धकांची कामगिरी

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 9:55PMमालवण : वार्ताहर 

डेरवण चिपळूण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय नेमबाजीच्या ‘युथगेम’ स्पर्धेत मालवण येथील तीन स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करीत विविध गटात सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकाविले.

राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पंढरपूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, माणगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील एकूण 1,600 स्पर्धक सहभागी झाले होते. यात मालवणचे चार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

18 वर्षांखालील वयोगटात टोपीवाला हायस्कूलच्या अभिषेक कदम याने  सुवर्ण पदक पटकाविले. भंडारी हायस्कूलची कु. हर्षदा पवार हिने तिहेरी यश संपादन करीत 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 16 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक तर 18 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त करीत रौप्य पदक पटकावले. तर जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूलची. संचिता कांदळकर हिने 16 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळवीत कांस्य पदक पटकाविले.

‘अल्पावधीतच मिळविलेल्या यशामुळे आपण अभिनंदनास प्राप्त असून या घवघवीत यशानंतर येथेच न थांबता अधिक प्रयत्न करून ऑलिंपिक पर्यंत यशाच्या पायर्‍या चढा’ असे प्रोत्साहनपर उद्गार ‘रायफल असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेचे अध्यक्ष जॉन नरोन्हा यांनी या मुलांच्या गौरवप्रसंगी काढले.