होमपेज › Konkan › मालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त

मालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

मालवण नगर पालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत 3  कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे या योजनेचे उर्वरित कामास लवकरच सुरवात होईल, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.  या योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असला तरी उर्वरित काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी आपण लक्ष ठेवणार असल्याचे  आ. नाईक यांनी सांगितले. 

मालवण तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक भरड येथील हॉटेल लीलांजली येथे झाली. या बैठकीनंतर आ.नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, गोपी पालव, प्रसाद मोरजकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, दीपक मयेकर, पंकज सादये, तपस्वी मयेकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

आ. नाईक म्हणाले, भुयारी गटार योजनेच्या  उर्वरित कामासाठी  निधी आलाच नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या योजनेच्या उर्वरित कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो जिल्हाधिकार्‍यांकडे वर्गही झाला आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी होईलच. मात्र, या पुढील काम दर्जेदार होण्यासाठी  आपण शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच शासनाकडून निधी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा  आभारी मानलेे.

सा. बां. रस्ते दुरुस्तीसाठी 7 कोटी  

कुडाळ- मालवण, मसदे - चुनवरे, कणकवली-आचरा या तीन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सात कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी सा. बां. विभागाकडे वर्ग झाला आहे.  जि. प. मालकीचे अनेक रस्ते खड्डेमय असून या कामासाठी  निधी उपलब्ध करण्या ऐवजी संबधित प्रतिनीधी केवळ बोंब मारण्याचे काम करत असल्याचा आरोप आ. नाईक यांनी केला. डिसेंबर महिन्यात पर्यटकांचा ओघ असल्याने 30, 31  डिसेंबरला पर्यटन महोत्सव घेण्याचे पत्र आपण मालवण नगरपालिकेस दिले आहे. यासाठी आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आ. नाईक यांनी  दिली.