Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Konkan › मालवण किनार्‍यावर महाकाय लाटा

मालवण किनार्‍यावर महाकाय लाटा

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:46PMमालवण : प्रतिनिधी

तोंडवळी-तळाशीलपाठोपाठ मालवण तालुक्यात मालवण दांडी, देवबाग, तारकर्ली या किनारपट्टी परिसरात शनिवारी उधाणाचा फटका बसला. दुपारी 12 वा.च्या सुमारास समुद्राला आलेल्या उच्चतम भरतीनंतर उंचच उंच लाटा किनार्‍यावर धडकत होत्या. या उधणामुळे देवबाग-भांजीवाडी, कुर्लेवाडी, भाटकरवाडी परिसरात लोकवस्तीत पाणी घुसले होते. या समुद्री उधाणामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उधाणाचा तडाखा बसलेल्या देवबाग गावाला जि.प. सदस्य हरी खोबरेकर, पं.स. सदस्या मधुरा चोपडेकर यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी मकरंद चोपडेकर, प्रवीण लुडबे उपस्थित होते.

गेले दोन दिवस तोंडवळी, तळाशील व आचरा परिसराला समुद्री उधाणाचा फटका बसला होता. त्यानंतर शनिवारी मालवणसह दांडी, तारकर्ली व देवबाग या किनारी गावांना अमावस्येच्या उच्चतम भरतीचा मोठा फटका ा बसल्याने किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. तर अनेक ठिकाणी लोकवस्तीत पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. शनिवारी सकाळपासून उधणाची स्थिती असल्याने महाकाय लाटा उसळत होत्या. त्यानंतर दुपारी 2 वा.च्या सुमारास समुद्राचे पाणी ओसरू लागले होते.

तारकर्ली खाडीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तारकर्ली जेटी परिसरात पाणी रस्तावर आले होते. उच्चतम भरती ओसरल्यानंतर येथील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे तारकर्ली व देवबाग परिसरात तीव्र लाटांच्या उधाणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.